रविवार विशेष
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः।
अनेन प्रसविष्यध्वम् एष वोऽस्त्विष्टकामधुक्॥3.10ll
---
🔍 शब्दार्थ (Word-to-word meaning):
सहयज्ञाः = along with sacrifices
प्रजाः = living beings (creatures, people)
सृष्ट्वा = having created
पुरा = in the beginning
उवाच = said
प्रजापतिः = the creator (Lord Brahma or the progenitor)
अनेन = by this (sacrifice)
प्रसविष्यध्वम् = you shall prosper (or multiply)
एषः = this (sacrifice)
वः = for you
अस्तु = let it be
इष्टकामधुक् = fulfiller of all desired objects (like a wish-fulfilling cow)
अनुवाद आणि अर्थ :
ही एक फारच अर्थपूर्ण आणि विचारप्रवृत्त करणारा श्लोक आहे.
इथे "यज्ञ" म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या — आपण ज्या गोष्टीसाठी या जन्मात आलो आहोत, त्या कर्तव्यांचा उल्लेख केला आहे.
भगवंत सांगतात की, आपण जर आपली कर्तव्ये निःस्वार्थ भावनेने, प्रामाणिकपणे आणि आनंदाने केली, तर त्यातून आपली प्रगती होते.
इथे एक सुंदर उपमा दिली आहे — आपले कर्तव्य पार पाडताना जर आपली नीयत चांगली असेल, तर त्याचे फळ आपल्याला कामधेनू (सर्व इच्छा पूर्ण करणारी गोमाता) मिळाल्यासारखे लाभते. पण याचा अर्थ असा नाही की आपण काहीही इच्छापूर्वक मागितले, आणि ते मिळेल.
खरं म्हणजे, जेव्हा आपण स्वतःचं कर्तव्य मनापासून, कुठलाही स्वार्थ न ठेवता करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचे उत्तम फळ मिळते.
"यज्ञ" हा शब्द ऐकायला थोडा कठोर वाटतो, पण विचार केला तर – आपण ज्या गोष्टी करणारच आहोत, त्या जर आनंदाने, हसत-हसत आणि मनापासून केल्या, तर त्या कधीच ओझं वाटत नाहीत. उलट त्या अर्थपूर्ण वाटतात.
या प्रकारच्या श्लोकांना समजून घेणं, त्यावर लिहिणं, आणि ते इतरांपर्यंत पोहोचवणं — मला हेच माझं यज्ञ वाटतं.
हा एक अध्यात्मिक सेवाभाव आहे.
माझ्यासाठी हे ओझं नाही, उलट आनंददायक कार्य आहे — आणि ते हसत हसत करत असतो.
आशा आहे की तुम्हीही तुमचं यज्ञ हसत-हसत पार पाडाल. 🙏
जय श्रीकृष्ण
– सुवास दारव्हेकर
No comments:
Post a Comment